कापसाचे भाव ११ हजारापर्यंत जाण्याची श्यक्यता
कापसाच्या उत्पादनात घट आली असून कापसाचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अद्याप कापूस विक्री केलेला नाही
नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) कापसाच्या उत्पादनात घट आली असून कापसाचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अद्याप कापूस विक्री केलेला नाही.बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक कमी होत आहे. शेतकरी कापसाला दहा हजार ते ११ हजार प्रति क्विंटल भाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत कापसाला सद्यस्थितीत सरासरी नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यामुळे आता कापसाची आवक वाढली आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत पळाशी येथील स्व. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात कापूस खरेदीला महिनाभरापूर्वी सुरूवात करण्यात आली . त्यावेळी लिलावात मुहूर्ताच्या कापसाला ८ हजार ३५७ रुपये भाव मिळाला होता.
शेतकऱ्यांनी घरात साठविलेला कापूस विक्रीसाठी आणला जात नसल्याचे दिसून येत आहे.